ताजे अपडेट

*पत्रकार एकनाथ थोरात यांची लोहार युथ फाऊंडेशनच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी निवड*

 

शिरूर (प्रतिनिधी) :

समाजकार्याची आवड आणि सामाजिक बांधिलकी जपणारे, तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सातत्याने मांडणारे शिरूर तालुक्यातील गुणाट गावचे पत्रकार एकनाथ पाराजी थोरात यांची लोहार युथ फाऊंडेशन (LYF) शिरूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिरूर तालुक्यातील सामाजिक व युवक चळवळीला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
पत्रकार एकनाथ थोरात हे दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित, वंचित व अन्यायग्रस्त घटकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडत आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, प्रशासनाचे लक्ष जनतेच्या प्रश्नांकडे वेधणे आणि सत्य लोकांसमोर आणणे, हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य आहे. यासोबतच ते पुणे जिल्हा राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनही प्रभावीपणे काम पाहत आहेत.
लोहार युथ फाऊंडेशन ही महाराष्ट्रभर कार्यरत असलेली, शिक्षित तरुणांना एकत्र आणून शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि युवक सक्षमीकरणासाठी काम करणारी संघटना आहे. अशा संघटनेची तालुकास्तरीय जबाबदारी एकनाथ थोरात यांच्याकडे सोपवण्यात आल्याने सामाजिक क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निवडीच्या वेळी लोहार युथ फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किशोर सोनवणे, राज्य उपाध्यक्ष नितेश लोखंडे, राज्य कार्याध्यक्ष अजय खंडागळे, सहकार्याध्यक्ष हर्षल आगळे, राज्य संघटक विजयराव लोखंडे, सहकार्याध्यक्ष मधुकरआबा लोखंडे, सचिव संजय इघे सर, सहसचिव दिनेश सोनाळेकर, सहसचिव प्रशांत हरळ, खजिनदार सुशीलकुमार ईघे, संचालक नितीन लोखंडे, संचालिका दिपाली विघवे, शितल खंडागळे, श्रीम. ज्योती हरले, संचालक सागर आगळे, संचालिका सुनिता गाडेकर, संचालक दत्तात्रय पोपळघट, खजिनदार उज्वल जयराम ईघे, जिल्हा संघटक विजय थोरात, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख राहुल थोरात, पिंपरी-चिंचवड शहर संपर्कप्रमुख मनोज लोखंडे, संघटक संदीप पखाले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकनाथ थोरात यांचे अभिनंदन करत, त्यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तालुक्यात लोहार युथ फाऊंडेशनचे कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला.

“लोहार युथ फाऊंडेशनसारख्या महाराष्ट्रभर कार्यरत, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संघटनेने माझ्यावर शिरूर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. ही केवळ पदाची नव्हे, तर समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जबाबदारी आहे.
शिरूर तालुक्यातील तरुणांना शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार व सामाजिक न्यायाच्या प्रवाहात आणण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून ठोस व परिणामकारक उपक्रम राबविणार आहे. विशेषतः तळागाळातील वंचित घटकांचे प्रश्न शासनदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील.
पत्रकार म्हणून समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची जी भूमिका मी आतापर्यंत बजावली, तीच भूमिका संघटनात्मक कामातही प्रामाणिकपणे पार पाडेन. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुणांना सोबत घेऊन लोहार युथ फाऊंडेशनचे कार्य शिरूर तालुक्यात अधिक मजबूत करण्याचा माझा संकल्प आहे.”

मा.एकनाथ पाराजी थोरात
(अध्यक्ष-शिरूर तालुका लोहार युथ फाऊंडेशन)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका