
आंबळे येथे मंगळवार सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या पिंजऱ्यात अंदाजे दीड वर्षांची मादी बिबट्या सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आली. बिबट्याच्या हालचालींमुळे परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ उपाययोजना करत पिंजरा लावला होता.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. जेरबंद बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून सक्षम प्राधिकरणाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखून वनविभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

