ताजे अपडेट

लोहार युथ फाउंडेशनच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी राहुल प्रकाश थोरात यांची निवड

लोहार समाजाच्या सक्षमीकरणासाठी राहुल थोरात यांची महत्त्वपूर्ण निवड

राहुल थोरात शिरूर (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्यभर लोहार समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या लोहार युथ फाउंडेशन (LYF) च्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी श्री.राहुल प्रकाश थोरात यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे पुणे जिल्ह्यात लोहार समाजातील युवक संघटन अधिक बळकट होणार असून समाजहिताच्या उपक्रमांना नवी दिशा मिळणार आहे.लोहार समाज हा परंपरेने कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानासाठी ओळखला जातो. बदलत्या काळात समाजातील युवकांनी शिक्षण, उद्योग, रोजगार व सामाजिक नेतृत्वात पुढे यावे, या उद्देशाने लोहार युथ फाउंडेशन कार्यरत आहे. याच विचारधारेनुसार संघटनात्मक अनुभव, समाजाशी असलेली नाळ आणि युवकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची क्षमता लक्षात घेऊन राहुल थोरात यांची निवड करण्यात आली.

 

देवगड येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी थोरात यांची निवड करण्यात आली.या निवडीच्या वेळी लोहार युथ फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किशोर सोनवणे, राज्य उपाध्यक्ष नितेश लोखंडे, राज्य कार्याध्यक्ष अजय खंडागळे,सहकार्याध्यक्ष हर्षल आगळे,सहकार्याध्यक्ष मधुकरआबा लोखंडे,सचिव संजय इघे सर,सहसचिव दिनेश सोनाळेकर, सहसचिव प्रशांत हरळ,खजिनदार सुशीलकुमार ईघे, संचालक नितीन लोखंडे,संचालिका दिपाली विघवे,शितल खंडागळे श्रीम.ज्योती हरले, राज्य संघटक विजय लोखंडे,संचालक सागर आगळे,संचालिका सुनिता गाडेकर, संचालक दत्तात्रय पोपळघट,खजिनदार उज्वल जयराम ईघे,जिल्हा संघटक विजय थोरात,शिरूर तालुका अध्यक्ष एकनाथ थोरात, पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख मनोज लोखंडे, संघटक संदीप पखाले तसेच राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी राहुल थोरात यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत समाजकार्य अधिक व्यापक करण्याचा विश्वास व्यक्त केला.पुणे जिल्ह्यात लोहार समाजातील युवकांना संघटित करणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षांविषयी माहिती देणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, तसेच समाजातील गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवणे, ही महत्त्वाची जबाबदारी राहुल थोरात यांच्यावर सोपविण्यात आली आहे.याशिवाय समाजातील वधू-वर परिचय मेळावे, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, सामाजिक जनजागृती कार्यक्रम तसेच समाजातील युवक-युवतींमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी प्रशिक्षण उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये संघटनात्मक संपर्क वाढवून प्रत्येक लोहार कुटुंबापर्यंत लोहार युथ फाउंडेशनचे कार्य पोहोचवण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी केला.

राहुल थोरात यांच्या निवडीमुळे लोहार समाजातील कलतरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, समाज एकत्र येईल आणि शिक्षण, रोजगार व सामाजिक न्यायाच्या दिशेने अधिक प्रभावी पावले उचलली जातील, असा विश्वास लोहार युथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.त्यांच्या या निवडीबद्दल बारामती विधानसभेचे आमदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिर्सुफळ गावचे आदर्श सरपंच सौ.जुईताई हिवरकर यांनी अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका